पुणेकरांच्या मदतीने पुणे मेट्रोचे काम प्रगती पथावर आहे. पुणे मेट्रोने प्रथमपासूनच मेट्रो
कामासंबंधी जास्तीत जास्त माहिती विविध सामाजिक माध्यमाद्वारे नागरिकांना उपलब्ध करून दिली
आहे. या उपक्रमाला पुढे चालना देत पुणे मेट्रोने आता ब्लॉग आणि इंस्टाग्राम अकाउंट सुरु केले आहे. यामुळे पुणे मेट्रोला जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचता येणार असून या कामात नागरिकांचे सहयोग आणि सुझवावर काम करता येणार आहे. नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महामेट्रो तत्पर असून या सर्व समाज माध्यमांचा मेट्रो काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या माध्यमांचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा व मेट्रोला मार्गदर्शन करावे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी महामेट्रोच्या ब्लॉग आणि इंस्टाग्राम
माध्यमांचे उदघाटन केले जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पुणे मेट्रोला पोहचता येईल.
महा मेट्रो सुरुवातीपासूनच शहरांतील नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे आणि त्यांच्या भौतिक आणि सोसिअल मीडियाद्वारे नागरिकांच्या समस्या समजावून घेत आहे.
त्यांच्याकडून प्राप्त सूचनांचे स्वागत करून यावर विचार करीत आहे.
पुणेमेट्रोचे फेसबुक लाईक्स ५ लाखापर्यंत पोहोचणार असून त्याचप्रमाणे ट्वीटर हँडलवरील पुणेमेट्रोचे
अनुयायी (Followers) ११ हजार च्या पार पोहोचले आहे. पुणे येथील नागरिकांच्या संपर्कात
राहण्यासाठी महा-मेट्रो सतत नवीन आणि अधिक नाविन्यपूर्ण मार्गाच्या शोधात असते. या दिशेने दुसऱ्या चरणात, महा-मेट्रोचा नागपूर प्रकल्प Instagram वर थेट गेला आहे. आज पुणे मेट्रो देखील Instagram वर थेट राहणार आहे.
आता महा मेट्रोने नागरिकांच्या अधिक संपर्कात राहण्यासाठी थेट ब्लॉग साईट सुरु करून एक वेगळी वाट निर्माण केली आहे. हा ब्लॉग नागरिकांना महामेट्रो प्रकल्पाविषयी अद्ययावत करेल, अशी खात्री आहे.
Nice blog